छायाचित्रे

विविध विकास कामे

खिरवडे गावामध्ये काळामादेवी मंदिर परिसरात बिहार पॅटर्न वृक्षारोपण मोहीम मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे कमीत कमी १२०० ते १५०० वृक्ष लागवड केली असून त्याचे सलग तीन वर्षे जतन केले आहे व आज रोजी त्या झाडांना मोसमानुसार फळे फळे येतात

गावामध्ये दसऱ्याला नऊ दिवस दुर्गादौड उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो सकाळी पाच ते नऊ या वेळेत दुर्गादौड मोहीम राबवली जाते हा उत्सव मोठ्या जोमाने तयारीने खेरवाडी गावात केला जातो व कमीत कमी लोकसंख्या 300 ते 400 लोक दररोज सकाळी उपस्थित असतात महिन्यातून एकदा मासिक सभा ग्रामपंचायतची होते व 15 ऑगस्ट 26 जानेवारी विशेष ग्रामसभा महिला ग्रामसभा अशा चार ते आठ ग्रामसभा वर्षातून होतात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम मुली व मुलांचा प्रोत्साहन म्हणून केला जातो

खिरवडे गावामध्ये अमृत सरोवर आहे म्हणजेच पिण्याच्या पाण्याचा मोठा तलाव आहे कमीत कमी त्याची लांबी एक किलोमीटर आहे तो गावाच्या दक्षिण दिशेस डोंगराच्या खालच्या बाजूला निसर्ग रम्य वातावरणामध्ये बांधण्यात आला आहे त्या तलावाच्या पाण्याचे पाणी गावाला वर्षभर मुबलक मिळते दरवर्षी मानव सरोवर तिथे 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला अमृत सरोवर म्हणून ध्वजावंदन केले जाते

सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील खिरवडे हे अत्यंत उपक्रमशील आणि प्रगतीपथावर असलेले गाव म्हणून ओळखले जाते. खिरवडेमध्ये पायाभूत सुविधांचा विकास तसेच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, महिला सशक्तीकरण, जलसंधारण, वृक्षारोपण, कौशल्य विकास यासह विविध क्षेत्रांतील उपक्रम मोठ्या ताकदीने राबविले जातात. यामुळे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे गाव अशी ओळख खिरवडेने अल्पावधीत कमावली आहे. गावामध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची काही क्षणचित्रे खाली जोडलेली आहेत…!